Video : ’50 खोके एकदम ओक्के’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधिमंडळात येताच विरोधकांची घोषणाबाजी

WhatsApp Group

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी ’50 खोके एकदम ओक्के’ अशी घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात पायर्‍यांजवळ येताच करण्यात आली आहे.

यावेळी विरोधकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. “आले रे आले गद्दार आले”, असंही म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.