चीनमध्ये कोरोनाचा कहर; स्मशानभूमीबाहेर मृतदेहांच्या लांबच लांब रांगा, पहा हिडीओ

WhatsApp Group

चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोनामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. चीनमधून जे व्हिडिओ समोर येत आहेत ती भीतीदायक आहेत. कोविड-19 च्या चीनच्या नवीन लाटेने लाखो रूग्णांसह रुग्णालये आणि शवागारांना व्यापून टाकले असताना, एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे जिथे लोक स्मशानभूमीच्या बाहेर लांब रांगेत वाट पाहत आहेत.

आरोग्य तज्ञ एरिक फीगेल-डिंग यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुटुंबे त्यांच्या घरातील व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे.

दररोज 10 हजार लोकांचा मृत्यू होत आहे 

एका दिवसात तीन कोटी 70 लाख कोरोना बाधित झाल्यानंतर चीन सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. चीनमध्ये शनिवारी एका दिवसात आठ हजार चिनी नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. यापूर्वी 21 डिसेंबर रोजी सर्वाधिक 10 हजार 700 लोकांचा मृत्यू झाला होता.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा