लोणावळा – लोणावळाकरांनी lonaavla जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. वाढते अपघात शहरवासियांच्या जीवावर उठू लागल्यामुळे नागरिक आता आक्रमक झाले आहेत. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पर्यायी मार्ग आता खुले केले करण्यात येत आहे. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले आहे.शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. परंतु एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी या मागणीला गांभीर्याने घेत नाहीये. म्हणूनच आज आक्रमक पवित्रा घेत, लोणावळाकरांकडून महामार्गावरील कुमार रिसॉर्ट चौकात रास्ता रोको सुरू करण्यात आला आहे.