Lok Sabha Election 2024: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; 21-17-10 जागावाटपाचा फॉर्म्युला

WhatsApp Group

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने आपल्या जवळपास सर्व जागा जाहीर केल्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांनीही आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. आज (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने देखील जागा वाटप जाहीर केलं आहे. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटप जाहीर करण्यात आलं.

महाविकास आघाडी जागावाटपात शिवसेनेच्या (UBT) सर्वाधिक जागा आहेत. शिवसेना (UBT) महाराष्ट्रात 21 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस पक्ष राज्यातील 17 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. याशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 10 जागांवर लोकसभा निवडणूक लढवताना दिसणार आहे.

एमव्हीए आघाडीतील जागावाटपाचा वाद शमल्यानंतर आता महाराष्ट्रातील मोठ्या जागांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदूरवार, धुळे, अकोला आणि भंडारा गोदिया, नांदेड, उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई या 17 जागा काँग्रेसच्या खात्यात आहेत. तर राष्ट्रवादीच्या 10 जागांमध्ये बारामती, शिरूर, भिवंडी, सातारा आणि माढा यांचा समावेश आहे. याशिवाय सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईसह 21 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

सांगलीच्या जागेवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बराच काळ संघर्ष असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर काँग्रेसने या जागेवरून हात काढून घेतला असून शिवसेनेने सांगलीतून उमेदवार उभा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना आधीच रिंगणात उतरवले आहे.