IPL 2022: अंतिम सामन्यात लॉकी फर्ग्युसनने टाकला या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू, जाणून घ्या किती होता वेग

WhatsApp Group

IPL 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे, तर गुजरात टायटन्सलाही प्रथमच आयपीएल जिंकून त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करायची आहे. दरम्यान, गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली आणि सलामीच्या जोडीने त्यांना चांगली सुरुवात करून दिली. मात्र, जैस्वाल 22 धावा करत बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन मैदानात आला. यानंतर हार्दिक पांड्याने पाचव्या षटकात लोकी फर्ग्युसनला गोलंदाजी दिली. त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने अचूक यॉर्कर टाकला, ज्याचा वेग 157.3kmph होता. हा या आयपीएलच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज

शॉन टेट – 157.3kmph
लॉकी फर्ग्यूसन – 157.3kmph
उमरान मलिक – 157kmph.
एनरिक नॉर्खिया – 156.2kmph.
उमरान मलिक – 156kmph.
एनरिक नॉर्त्जे – 155.2kmph