Co-Operative Society Elections 2022 : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

WhatsApp Group

Co-Operative Society Elections 2022 : राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या (Cooperative Society) निवडणुका (Cooperative society Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावरुन (OBC reservation) निर्माण झालेला पेच, राज्यभर मुसळधार असलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार होते. स्थानिक राजकारणामध्ये या निवडणुकांना अधिक महत्त्व असते.

Devendra Fadnavis meets Raj Thackeray फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण

याआधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घेतला. सुप्रीम कोर्टात (supreme court) ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्द्यांवरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि इतर राजकीय पक्षांनी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा केली.