
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत (Britain PM) ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना पराभवाचा धक्का लागला आहे. युकेच्या परराष्ट्र मंत्री लिस ट्रस (Liz Truss) यांचा पंतप्रधान व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे त्या आता बोरिस जॉनसन यांची जागा घेतील. लिस ट्रस यांना कंन्जर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आलं आहे.
बोरिस जॉनसन यांचा उत्तराधिकारी म्हणून पक्षाच्या सदस्यांना ऋषी सुनक आणि लिस ट्रस यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. 42 वर्षांच्या सुनक यांना पंतप्रधानदाच्या शर्यतीत 47 वर्षांच्या लिस ट्रस यांनी पराभूत केलं आहे. लिज ट्रस ब्रिटनच्या तीसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्या आधी थेरेसा मे, मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडचे पंतप्रधान पद भूषवले आहे.
#WATCH | Liz Truss defeats rival Rishi Sunak to become the new Prime Minister of the United Kingdom pic.twitter.com/Xs4q2A2ldu
— ANI (@ANI) September 5, 2022
कोणाला किती मतं?
- लिस ट्रस : 81,326
- ऋषी सुनक : 60,399
- एकूण मतं: 172,437
- एकूण मतदान : 82.6%
- रद्द झालेलं मतं : 654