T20 World Cup 2022 : पहिल्या विश्वचषकापासून ते आतापर्यंत कोण-कोणत्या संघाने पटकावले आहे विजेतेपद? येथे जाणून घ्या…

WhatsApp Group

T20 World Cup Winning Teams list : आता T20 विश्वचषक 2022 सुरु होण्यासाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. संघ ऑस्ट्रेलियात दाखल होऊ लागले असून तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. दरम्यान, टीम इंडिया संघ आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून लवकरच टीम तेथे पोहोचणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळच्या विश्वचषकात प्रवेश करणार आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीने देशात परतल्यावर चषक आणावा अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय संघाने 2007 साली खेळलेला पहिला T20 विश्वचषक जिंकला होता, पण तेव्हापासून ट्रॉफी जिंकलेली नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पहिल्या विश्वचषक ते 2021 पर्यंत कोणता संघ चॅम्पियन बनला आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला होता पहिला T20 विश्वचषक 

2007 साली पहिला T20 विश्वचषक खेळला गेला होता, त्याच्या यजमानपदाची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेने घेतली होती. नवी टीम इंडिया आणि नवा कर्णधार एमएस धोनी विश्वचषक जिंकेल असे कोणालाच वाटले नव्हते, कारण त्यावेळचे मोठे खेळाडू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे संघात नव्हते. त्यामुळे युवा खेळांडूना संधी मिळाली होती. एमएस धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. पण भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विश्वचषक ट्रॉफीवर आधीच कब्जा केला. भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 1983 नंतर भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला विश्वचषक जिंकता आलेला नाही.

पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी पटकावले आहे विजेतेपद 

2007 नंतर 2009 साली पुन्हा विश्वचषक खेळला आणि यावेळी आपल्या शेजारी पाकिस्तानला चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. पाकिस्तानी संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत ट्रॉफीवर कब्जा केला. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा विश्वचषक आयोजित करण्यात आला आणि यावेळी इंग्लंडने विजेतेपदावर कब्जा केला. 2012 साली जगाला पुन्हा एक नवा चॅम्पियन मिळाला आणि यावेळी वेस्ट इंडिजच्या संघाने बाजी मारली. 2014 साली श्रीलंकेच्या संघाने सर्वांचा पराभव करत इतर सर्व संघांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. 2016 मध्ये पुन्हा विश्वचषक खेळला गेला आणि यावेळी पुन्हा वेस्ट इंडिजचा संघ चॅम्पियन बनला. वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे ज्याला दोनदा विश्वविजेते बनण्याचा मान मिळाला आहे. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा विश्वचषक होणार होता, त्याचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले, पण कोरोनामुळे त्याचे आयोजन होऊ शकले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतःहून असे करण्यास नकार दिला होता. पण 2021 मध्ये भारताला यजमानपद मिळाले. याच दरम्यान कोरोनाचा उद्रेक झाला होता, त्यामुळेच भारताला यजमानपद मिळाल्यानंतरही ते यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन ठरला. विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेट संघ मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद ठरले. आता पुन्हा एकदा त्याचे आयोजन होणार असून, यावेळच्या विश्वचषकाला नवा चॅम्पियन मिळणार का, याआधी विश्वचषक जिंकलेल्या संघांपैकी तोच संघ पुन्हा विजेतेपदावर कब्जा करतो का, हे पाहावे लागेल.