
शिंदे गटाच्या उपनेत्यांची यांदी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटातील 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून उपनेत्यांच्या यादीत संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही.
संजय शिरसाट हे सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे गट भाजपाच्या पाठिंब्यामुळे सत्तेत सहभागी झाल्यानंतर संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी देखील बोलून दाखवली. मात्र आता त्यांना उपनेत्यांच्या यादीमधूनही त्यांना देखील आले आहे.
उपनेतेपदासाठी एकूण 26 जणांची निवड करण्यात आली असून त्यात अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वाढवकर यांचा समावेश आहे.