ख्रिसमस आणि नववर्षाला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने, शिंदे सरकारचा निर्णय

WhatsApp Group

मुंबई: नवीन वर्ष आणि ख्रिसमस या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते. अशा मद्यप्रेमींसाठी आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.

2022 हे वर्ष आता लवकरच संपणार असून, 2023 चा उदय होणार आहे. या घोषणेनुसार 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकाने तीन दिवस उघडी राहतील. ही मर्यादा रात्री ११ वाजेपर्यंत आहे Liquor Shop Till 5 In The Morning.