Sanjay Raut : चीनप्रमाणे आम्हीही कर्नाटकात घुसू; सीमावादावर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

WhatsApp Group

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आता वादग्रस्त विधान केले आहे. चीन ज्या प्रकारे देशात घुसला त्याच पद्धतीने आम्ही कर्नाटकात प्रवेश करू, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्हाला हा वाद चर्चेतून सोडवायचा आहे पण कर्नाटकचे मुख्यमंत्री आग लावत आहेत. महाराष्ट्रात कमकुवत सरकार असून याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही.

बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, दिल्लीत बसलेले भाजप सरकार चीनला इंचभरही देणार नाही असं सांगतात, पण चीन घुसला आहे. आम्ही देखील कर्नाटकात असाच प्रवेश करू. आत जाण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, पण आमचा विश्वास आहे की देश एक आहे, हा प्रश्न चर्चेने सोडवला जाऊ शकतो.

अत्याचाराविरोधात आवाज उठवणार 

संजय राऊत म्हणाले, “ज्या विषयावर 100 हून अधिक लोकांनी बलिदान दिले, त्या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही त्यांची भूमिका घेत नाहीत त्यामुळे बोम्मईसारखे लोक आवाज उठवणारच. कर्नाटक सरकार किंवा जनतेशी आमचे वैयक्तिक वैर नाही. ही 70 वर्षे जुनी समस्या आहे. हा मानवतेचा प्रश्न आहे. अत्याचाराविरोधात आम्ही आवाज उठवू.

संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यापूर्वी विधानसभेत सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि महाराष्ट्रातील एका लोकसभेच्या सदस्याला बेळगावमध्ये येण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत असे ठरले की तेथे जाण्यापासून कोणालाही रोखले जाणार नाही, मग तेथील जिल्हाधिकारी असा निर्णय कसा घेऊ शकतात.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा