वयाच्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट ऋषी कुमार शहीद, वर्षभरापूर्वीच सैन्यात झाले होते भरती!

WhatsApp Group

बिहार – भारतीय सैन्यातील २३ वर्षीय लेफ्टनंट ऋषी कुमार हे शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बेगुसरायसह पूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

शहीद ऋषी कुमार हे बेगुसराय जिल्हा मुख्यालयातील प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजीव रंजन असं आहे. ऋषी कुमार हे वर्षभरापूर्वीच भारतीय सैन्यात दाखल झाले होते. 30 ऑक्टोबरला सुंदरबन सेक्टरमधील राजौरी नौशेरा येथे भूसुरुंग स्फोटात ते शहीद झाले.


लेफ्टनंट ऋषी कुमार यांच्या मृत्यूची बातमी समजताच देशभरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ऋषी यांच्या वडिलांनी सांगितले की, 4 दिवसांपूर्वीच त्यांचे आपल्या आईशी बोलणं झालं होतं. ऋषी कुमार यांनी बहिणीच्या लग्नासाठी सुट्टी घेऊन येत असल्याचेही सांगितले होते. मात्र दुर्देवाने ते आता आपल्या बहिणीचं लग्न कधीच पाहू शकणार नाहीत.