Manoj Pande: महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

WhatsApp Group

देशाच्या लष्करप्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे Manoj Pande यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार घेतील. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, “सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.”

30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. मनोज पांडे हे देशातील पहिले अभियंता असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर मानले जातात.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर 1982 मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) चे पदवीधर आहे आणि त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये उच्च कमांड कोर्सला देखील शिक्षण घेतले आहे. आपल्या 36 वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

गेल्या तीन महिन्यांत काही उच्चपदस्थ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर पांडे हे सर्वात ज्येष्ठ बनले आहेत. आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला 31 मार्च रोजी निवृत्त झाले. अन्य काही ज्येष्ठ जानेवारीअखेर निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी 31 जानेवारीला निवृत्त झाले.

39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.