‘लेफ्टनंट कमांडर’ सूरज वारंग या कोकण सुपुत्राची मोठी झेप!

WhatsApp Group

सिंधुदुर्ग –  सावंतवाडी येथील माणगावचा सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सूरज जयसिंग वारंग यांना नौदल दिनी नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदकाने सन्मानित करण्यात आले. एमआयजी २९ के या नेव्हीतील विमानाबाबत मैन्टेनसची सुविधा भारतात नव्हती. विमानांचे मेन्टेनस हे रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांच्या ओव्हर ऑल फैसिलिटी भारतात सेटअप करण्याबाबत लेफ्टनंट कमांडर सूरज ल यांनी प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले. आज विमान मेन्टेनसकरिता रशियावर अवलंबून न राहता नेव्हीच्या विमानाचे ओव्हरऑल है फैसिलिटी सेटअप भारतात होत आहे. त्यामुळे करोडो रुपयांची बचत होते. सूरज यांच्या या व नौदलातील अन्य कामाची दखल घेऊन नौदलाने त्यांना ‘नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक’ देऊन सन्मानित केले

माणगाव येथील अ‍ॅड. जयसिंग वारंग व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका स्वप्नाली वारंग यांचा सूरज हा मुलगा असून त्यांची पत्नी ज्युही नौदलातच लेफ्टनंट कमांडर आहे. सूरज यांचे एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात झाले. लहानपणापासून त्यांना पायलट होण्याची इच्छा होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. सूरज यांनी एरॉनॉटिकल इंजिनिअर्सची पदवी पुणे येथे प्राप्त केली. त्यानंतर युपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस एस. बी.) मार्फत त्यांची नौदलात निवड झाली.

नौदलाच्या आरएनए इजमल्ला, केरळ येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नौदलाच्या अ‍ॅव्हिएशन केडरमध्ये निवड झाली. त्यानंतर मिग-२९ के या लढाऊ विमानाचे इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची निवड गोवा येथे करण्यात आली. या नियुक्तीदरम्यान सूरज यांनी आयएनएस विक्रमादित्यवर यशस्वी सेवा पूर्ण केली. सध्या ते एरोडायनॅमिक स्पेशलायझेनकरिता आय. आय. टी. कानपूर येथे दोन वर्षासाठी प्रशिक्षण घेत आहे. कमी कालावधी सेवाकाळात सूरज यांनी नौदलात कौतुकास्पद भरारी घेतली आहे. ‘मेक इन इंडियाचे ते पुरस्कर्ते असून त्यांनी आपल्या सेवाकाळात भारतात विमाने बनविणे व त्यांचे मेन्टेनस करणे यासाठी प्रयत्न करावे, अशी आपली इच्छा असल्याचे सूरज यांच्या आई स्वप्नाली वारंग यांनी सांगितले.

कोकणाने आपल्या देशाला-राज्याला विविध श्रेत्रातील अनेक हिरे दिले आहेत. आता या हिऱ्यांमध्ये लेफ्टनंट कमांडर सूरज जयसिंग वारंग यांचाही समावेश झाला आहे. लहानपाणापासूनच कष्ट, एकाग्रता, शिकण्याची धडपड ठेवली तर आपण हवं ते यश मिळवू शकतो याचं चांगलं उदाहरण सूरज वारंग या युवकाने आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे.