Mumbai Fire: मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग; 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

WhatsApp Group

मुंबई – मुंबईमध्ये पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही परंतू ही आग लेव्हल 2 ची असल्याचं समोर आलं आहे. Haico Super Market मध्ये सकाळी 7.30च्या सुमारास ही आग लागली होती.

कालपासूनच मुंबईला पावसाने झोडपल आहे. अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अशातच पवईतील हीरानंदानी परिसरात ही भीषण आग लागली आहे. आग मोठी असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मॉलमधील लाखोंची सामग्री जळून खाक झाली आहे.