
क्रिकेट जगताला भारताने अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यातील एक म्हणजे भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राज. भारतीय महिला संघासाठी (Team India) 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने आज (बुधवारी) दुपारी सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. तिचे काही रेकॉर्ड आजवर कोणी तोडू शकलेलं नाही, चला तर जाणून घेऊया…
मिताली राजचे प्रमुख रेकॉर्ड्स
- मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.
- 2017 महिला क्रिकेट विश्व चषकादर्मयान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
- मितालीने एकाच संघासाठी सर्वाधीक वनडे सामने खेळले असून या सामन्यांची संख्या 109 आहे.
- मिताली विश्वचषक स्पर्धेत 1,000 हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
- मितालीने वनडे सामन्यात सर्वाधिक रन केले असून 232 सामन्यात तिने 7 हजार 805 रन केले आहेत.
- मिताली आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दोन हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
- मिताली 20 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
- 200 वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेट मितालीच आहे.
- सहा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे.
- टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून 2002 साली तिने इंग्लंड विरुद्ध 214 धावांची खेळी केली होती.
कर्णधार म्हणून मितालीची कामगिरी
- मिताली राज (भारत) : एकूण सामने 155, विजय 89, पराभव 63
- सी. एडवर्ड्स (इंग्लंड) : एकूण सामने 117, विजय 72, पराभव 38
- बी. क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : एकूण सामने 101, विजय 83, परभव 17
सर्वात वयस्कर कर्णधार
मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (आयसीसी) महिला आणि पुरुषांच्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारी सर्वात वयस्कर कर्णधार (Oldest Indian Captain Playing In ICC Tournament) बनली होती. त्यावेळी तिचे वय 39 वर्षे 93 दिवस एवढे होते. तिच्याआधी डायना एडुलजी यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 1009 सालच्या महिला वनडे विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळली होती. तेव्हा त्यांचे वय 37 वर्षे 184 दिवस इतके होते.