
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळख असणाऱ्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची पूजा केली. याबरोबरच तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम… pic.twitter.com/K0DDhEpg9w
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 25, 2023
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, साने गुरूजी तरुण मंडळ येथे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.