
पुणे – केरळमध्ये मान्सून (Monsoon) आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लवकरच पाऊस बरसणार असण्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वेळेआधी पाऊस बरसला आहे.साताऱ्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) तडाखा बसला आहे. तर काही ठिकाणी मुळासकट झाडे ऊन्मळून पडली आहे. तसेच घरांचीही पडझड झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रामध्ये पुढील काही दोन-तीन दिवसांसाठी हवामानाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन २९ मे रोजी झाले आहे. त्यात ईशान्य भारत, कर्नाटक, केरळमध्ये (Kerala) मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून ३ रोजी दाखल होईल असा अंदाज होता. आता हवामान खात्याचा नव्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये ८ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ८ जून रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच ९,१०,११ रोजी सर्वत्र पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेदशाळेने वर्तवला आहे Monsoon Latest Update