29 मे 2022 रोजी सिद्धू मूसेवाला याचे निधन झाले. लोकप्रिय गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याची मानसाच्या जवाहर गावात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मूसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गायकाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांचीही ह्रदये तुटली. आता बऱ्याच काळानंतर सिद्धू मूसेवालाच्या घरात पुन्हा एकदा आनंदाने दार ठोठावले आहे. पंजाबचा प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याची आई चरणजीत कौर लवकरच आई होणार आहे.
आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बाळाचे माता पिता होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही सिद्धूच्या चाहत्यांना भेटणं टाळलं होतं. दर रविवारी ते चाहत्यांची भेट घ्यायचे. पण आता ते सार्वजनिक ठिकाणी फारसे बाहेर पडलेले दिसले नाहीत. सिद्धू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. 29 मे 2022 रोजी त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा तो २९ वर्षांचा होता. अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्येच त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर सगळीकडेच तणावाचं वातावरण होतं. त्याच्या आईवडिलांनाही लेकाच्या हत्येनंतर जबर धक्का बसला होता.