मुंबई – दिग्गज लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8:12 वाजता निधन झाले. मुंबईतील ब्रीच क्रॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी
रविवारी देशातील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे.
लतादीदींच्या निधनामुळे केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गजांनी लतादीदींच्या निधनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. लता मंगेशकर यांचे पार्थिव आता त्यांच्या प्रभू कुंड या निवासस्थानी पोहोचले आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर त्यांच्या अंतिम निरोपाची तयारी सुरू झाली आहे.