मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता पुन्हा एकदा लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली असल्याती माहिती समोर आली आहे.
“ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर असून अजूनही आयसीयूमध्ये आहेत. सध्या तरी त्या डॉक्टरांच्या देखरेखीमध्येच राहतील” अशी माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दिली आहे.
Veteran singer Lata Mangeshkar’s health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U7nfRk0WnM
— ANI (@ANI) February 5, 2022
९२ वर्षीय सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.
हेही वाचा
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम
जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक