मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना अजूनही रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी ही माहिती दिली. ९२ वर्षीय लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉ. प्रतत समदानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनिया दोन्ही झाला आहे. त्याचे वय लक्षात घेऊन त्याला काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना पुढिल काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
Singer Lata Mangeshkar needs care, which is why she’ll remain under doctors’ supervision in ICU for a few more days. Her condition is the same as before; no one’s allowed to meet her yet: Dr Pratit Samdani, who’s treating her at Mumbai’s Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/4vMPWxmkr1
— ANI (@ANI) January 16, 2022
डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांची रुग्णालयात उत्तम काळजी घेत जात असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र आता या परिस्थीतीत त्या कोणालाच भेटू शकणार नाही असंही त्यांनी सांगितले.