लसिथ मलिंगाची आयपीएलमध्ये पुन्हा एन्ट्री, मुंबई नाही आता ‘या’ संघात दिसणार मलिंगा

WhatsApp Group

आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या सिझनसाठी सर्वच टीमची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आगामी सिझनसाठी फास्ट बॉलिंग कोच म्हणून श्रीलंकेचा दिग्गज बॉलर लसिथ मलिंगाची (Lasith Malinga) नियुक्ती केली आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा या टीमचा हेड कोच आहे, त्यानंतर आता आणखी एका श्रीलंकन दिग्गजाची राजस्थानच्या कोचिंग स्टाफमध्ये एन्ट्री झाली आहे.

मलिंगा आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स संघाकडून एका दशकापेक्षा जास्त काळ खेळला आहे. तो आयपीएल इतिहासामधील सर्वात यशस्वी बॉलर आहे. मलिंगाने 122 आयपीएल मॅचमध्ये 7.19 च्या सरासरीने 170 विकेट्स घेतल्या आहेत. एका आयपीएल मॅचमध्ये 4 विकेट्स घेण्याची कामगिरी 6 वेळा तर 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने 1 वेळा केली आहे. मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदामध्ये मलिंगाच्या भेदक बॉलिंगचा सर्वात मोठा वाटा आहे.

मलिंगाच्या या मोठ्या अनुभवाचा राजस्थान रॉयल्सला फायदा होणार नक्कीचं आहे. या टीममध्ये आगामी सिझनसाठी ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नॅथन कुल्टर नाईल, नवदीप सैनी यांसारखे फास्ट बॉलर संघात आहेत. संजू सॅमसन राजस्थानचा कॅप्टन आहे. राजस्थानची आयपीएल स्पर्धेतील पहिली मॅच हैदराबाद संघाविरूद्ध 29 मार्च रोजी होणार आहे.