Trending : जगातील सर्वात मोठा अजगर पाहिलात का? पाहा फोटो

WhatsApp Group

अमेरिकेतील (America) जैव वैज्ञानिकांना ‘जगातील सर्वात मोठा’ अजगर सापडला आहे. फ्लोरिडामध्ये (Florida) सापडलेला हा बर्मीज जातीचा साप मादी अजगर (Burmese python) मादी आहे. या अजगराची लांबी 18 फूट आणि वजन 98 किलो आहे. हा मादी अजगराच्यआ पोटामध्ये 122 अंडी आहेत. शास्त्रज्ञांना अजगराच्या पोटात खुराचे अवशेष सापडले आहेत, यावरून या अजगराचं शेवटचं भक्ष्य हरण असल्याचं समोर आलं आहे.

या मादी अजगराची नेक्रोप्सी केल्यानंतर त्याचा पोटामध्ये 122 अंडी असल्याचं समोर आलं आहे. कंझर्व्हन्सी संस्थेच्या (Conservancy) शास्त्रज्ञांनुसार एकाच वेळी अजगराच्या पोटात इतकी जास्त अंडी सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. या अजगराच्या पोटात 122 अंडी सापडणं हा विक्रम आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या अजगराचं वय सुमारे 20 वर्ष आहे. हा आतापर्यंत सापडलेला जगातील सर्वात मोठा अजगर आहे. या आधी सर्वात मोठा अजगर सापडला होता. हा नर अजगर 16 फूट लांब आणि 63 किलो वजनी होता.

एका वृत्त पत्राच्या रिपोर्टनुसार, या विशालकाय अजगराला पकडण्यसाठी शास्त्रज्ञांना 20 मिनिटं कठोर प्रयत्न करावे लागले. शास्त्रज्ञांना अजगराच्या पोटामध्ये हरणाचे अवशेष सापडले आहेत, यावरनू त्यानं हरणाला भक्ष्य केल्याचं समोर आलं. ॲमी बेनेट विलियम्स यांनी या अजगराचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.