मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पला भुस्खलनाचा तडाखा; 7 जवानांचा मृत्यू तर 30-40 जवान अडकल्याची भीती

WhatsApp Group

मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातमधील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 टेरिटोरियल आर्मी छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली आहे. या अपघातानंतर डझनभर जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आलं आहे. त्याच वेळी, 30-40 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.