लालूप्रसाद यादव राहुल गांधींना म्हणाले- तुम्ही लग्न करा, आम्ही…

WhatsApp Group

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधी पक्षांची शुक्रवारी (२३ जून) बिहारमधील पाटणा येथे बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये नितीश कुमार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली. यावेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मजेशीर शैलीही पाहायला मिळाली.

लालू प्रसाद यादव काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत असे बोलले की सगळे हसायला लागले. राहुल गांधींचे कौतुक करताना लालू यादव म्हणाले की, राहुल गांधींनी खूप चांगले काम केले आहे. देशभर पायी प्रवास केला. यादरम्यान त्यांची दाढीही वाढली. आता दाढी थोडी लहान केली आहे, ते ठीक आहे, पण त्यांनी लग्नाबाबत आमचा सल्ला मानला नाही. लग्न करायला हवे होते. अजुनही वेळ गेलेली नाही. लग्न करा, आम्ही मिरवणुकीला येतो. तुमची आई आमच्याकडे तक्रार करते की तू तिचे ऐकत नाहीस, लग्न करत नाहीस.

यावर राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही म्हणाल तर लग्न होईल. लालू यादव यांनी पीएम मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आता अमेरिकेत जाऊन चंदनाचे वाटप करत आहेत. गोध्रा नंतर अमेरिकेने आपल्या पर्यटकांना भारतात जाऊ देण्यास नकार दिला. हे लोक कसे विसरले. आज देश अधोगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशात महागाई वाढत आहे.

लालू यादव म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्वांनी खुलेपणाने आपले मत मांडले असून पुढील बैठक शिमल्यात होणार असून भविष्यातील रणनीती ठरवणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. एकजुटीने लढायचे आहे. देशातील जनता म्हणते की तुम्हाला मत आहे, पण तुम्ही एकत्र येत नाही, त्यामुळे तुमची मतं विभागली जातात आणि भाजप-आरएसएसचा विजय होतो.

बिहारचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, हे लोक हनुमानजींचे नाव घेऊन निवडणूक लढवतात. यावेळी कर्नाटकात हनुमानजींनी अशी गदा मारली की राहुल गांधींचा पक्ष जिंकला. हनुमानजी आता आमच्यासोबत आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी यांची वाईट अवस्था होणार हे निश्चित.