
Lalbaugcha Raja 2022 First Look: ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) मूर्तीची पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे.
यंदा कोविड निर्बंधांशिवाय दोन वर्षांच्या कालावधीनंतर 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी 2022 उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो भाविक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी लालबागचा राजा गणेश चतुर्थी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत अकाऊंटने त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवार, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता लाइव्ह होणार्या गणपतीच्या मुख दर्शनाचे लाइव्ह स्ट्रीमिंग तपशील पोस्ट केले आहेत. लालबागचा राजा 2022 च्या प्रथम दर्शनाची तारीख, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन डिटेल्स खाली पहा.
View this post on Instagram