लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

0
WhatsApp Group

Bharat Ratna to Lal Krishna Advani: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – ते आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी देशाची सेवा केली आणि आपला ठसा उमटवला. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच देश आणि जनतेची सेवा करण्याची प्रेरणा देत असल्याचे ते म्हणाले.