Ladki Movie Trailer: रामगोपाल वर्मा यांच्या ‘लडकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; Pooja Bhalekar चा Hot अंदाज पाहून चाहते घायाळ

रामगोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांनी महिला शक्तीला प्रणाम करणारा ‘लडकी’ (Ladki) चित्रपट तयार केला आहे. खरे तर हा चित्रपट पूर्वीच प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकले नव्हते. मात्र आता रामगोपाल वर्माचा हा महत्वाकांक्षी चित्रपट 15 जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा अनोखा आणि भव्य ट्रेलर शुक्रवारी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला.
‘लडकी’ हा चित्रपट मार्शल आर्टिस्ट असलेली अभिनेत्री पूजा भालेकरची (Pooja Bhalekar) ओळख करून देणारा इंडो चायनीज निर्मिती असलेला चित्रपट आहे. पूजा भालेकर ब्रूस लीने स्थापन केलेल्या फाइटिंग आर्ट जीत कुन दो या कलेमध्ये माहिर आहे. तायक्वांदोमध्ये तज्ञ असलेल्या पूजाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पूजाने ‘लडकी’मधील तिच्या भूमिकेसाठी जीत कुन दो चे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
‘लडकी’ हा चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 15 जुलै रोजी चीन आणि भारतात प्रदर्शित होणार. चीन आणि भारतात एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. ‘लडकी’च्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेला ट्रेलर हा 8 मिनिटांचा आहे. जगातील फिचर फिल्मचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेलर ‘लडकी’चा आहे.