मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी लाडक्या बहिणींना अर्ज करता येणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची मुदत आणखी वाढवण्याची शक्यता आहे. यातच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
तिसरा हप्त्या 29 सप्टेंबर रोजी पाठवला जाईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 महिलांना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून, दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 महिलांना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.ज्या महिलांना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 529 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.