AUS VS WI: लाबुशेनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील आठवा फलंदाज

WhatsApp Group

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनने एक खास विक्रम केला आहे. लबुशेनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले तर पहिल्या डावात द्विशतक झळकावले. एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा लबुशेन हा जगातील आठवा खेळाडू आहे, तर ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात चार गड्यांच्या मोबदल्यात 598 धावा करून डाव घोषित केला होता. मार्नस लबुशेनने 204 धावांची खेळी केली, तर स्टीव्ह स्मिथ 200 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या डावाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ 283 धावांवर गारद झाला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 315 धावांची आघाडी मिळाली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न घेण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात 2 बाद 182 धावा करून डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 498 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

एकाच सामन्यात द्विशतक आणि एक शतक झळकावणारे फलंदाज

  • डग वॉल्टर्स – ऑस्ट्रेलिया – 1969
  • सुनील गावस्कर – भारत – 1971
  • लॉरेन्स रोवे – वेस्ट इंडीज – 1972
  • ग्रेग चॅपल – ऑस्ट्रेलिया – 1974
  • ग्रॅहम गूच – इंग्लंड – 1990
  • ब्रायन लारा – वेस्ट इंडिज – 2001
  • कुमार संगकारा – श्रीलंका – 2014
  • मार्नस लाबुशेन – ऑस्ट्रेलिया – 2022

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा