बंगळुरू येथे भारत आणि श्रीलंका (Ind Vs SL) यांच्यातील कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात बदल केले आहेत. टीम इंडियाने फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळले आहे Kuldeep Yadav released from India Test squad. तर अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. अक्षर पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर होता, आता तो तंदुरुस्त झाल्यामुळे संघात पुनरागमन करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षर पटेल मोहालीमध्येच टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. अक्षर पटेलने डिसेंबर २०२१ मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर होता. आता अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाल्याने कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आले आहे.
With Axar Patel regaining full fitness, India have released Kuldeep Yadav from the Test squad ahead of the second #INDvSL fixture. @vijaymirror has more
— Cricbuzz (@cricbuzz) March 7, 2022
बंगळुरू कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)