सिंधुदुर्ग – १७ जागा असलेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणूकित भाजप ८, शिवसेना ७ जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉग्रेसचा २ जागेवर विजय झाला आहे. कुडाळ नगरपंचायतच्या गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा त्यांना ८ जागांवरच समाधान मानावे लागत आहे. फक्त एका जागेमुळे कुडाळ नगरपंचायतीवरील भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आहे. तर काँग्रेस या नगरपंचायतीत किंगमेकर म्हणून समोर आली आहे.
कुडाळ नगरपंचायत निवडणूक
एकूण जागा – १७ जागा
भाजप – ८
शिवसेना – ७
कॉग्रेस – २
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी कुडाळ नगरपंचायत निवडणूकित शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगले लढले होते. यामुळे आता काँग्रेसचे विजयी उमेदवार सेनेसोबत जाणार की भाजपासोबत हे यावरच सत्तेत कोण येणार हे ठरणार आहे.