‘रात्रीस खेळ चाले’मधून अपूर्वा नेमळेकर बाहेर, नवीन शेवतांचा फोटो पाहा

WhatsApp Group

मुंबई – शेवंता या गाजलेल्या पात्राची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने ‘रात्रीस खेळ चाले ३’ कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मानधन आणि नवीन कलाकारांकडून आक्षेपार्ह वर्तन या कारणामुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अचानक या कार्यक्रमातून बाहेर पडली आहे. अपूर्वाच्या जागी आता अभिनेत्री कृतिका तुळसकर ही आता शेवंताच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.

शेवंताच्या भूमिकेबद्दल बोलताना कृतिका म्हणाली, “रात्रीस खेळ चाले ही एक अतिशय लोकप्रिय मालिका आहे, आणि त्यातील सर्व पात्रे खूप लोकप्रिय आहेत, आणि प्रेक्षकांना देखील ती खूप आवडतात. मला शेवंताची भूमिका मिळाली असली तरी, या भूमिकेची लोकप्रियता लक्षात घेऊन ही भूमिका साकारणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी असणार आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील.”

कृतिका ही चित्रपट अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत बबन (2018), विजेता (2020), आणि पाशबंध (2015) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’ च्या चाहत्यांसाठी अपूर्वाची एक्झिट ही खरोखरच धक्कादायक बातमी आहे. तिने कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या चॅनलवर आणि सेटवरील नवीन कलाकारांवर काही गंभीर आरोप केले. अपूर्वाने हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

कृतिका शेवंताच्या रुपात प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करते हे पाहणे रंजक ठरणार. ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये अभिनेते माधव अभ्यंकर, संकेत कामत, भाग्य नायर, शकुंतला नरे इत्यादी प्रमुख भूमिकेत आहेत. गेली अनेक वर्ष अपूर्वा नेमळेकर ही शेवतांच्या भूमिकेत काम करत असून या भूमिकामुळे तीचे लाखो चाहते तयार झाले होते.