
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोन्ही स्टार्स या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अशा परिस्थितीत वरुण आणि क्रितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सचे त्यांना जोरदार ट्रोलही करत आहेत.
नुकतेच क्रिती सेनन आणि वरुण धवन यांनी आगामी ‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे रिलीज केले. या गाण्याच्या लॉन्चिंगच्यावेळी या दोन स्टार्समध्ये उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली. यादरम्यान दोन्ही स्टार्स थिएटरच्या छतावर चढले आणि डान्स केला.
अलीकडच्या काळात प्रचाराची शैली बदलली आहे. चित्रपट लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. वास्तविक, लोकांचे लक्ष पटकन वेधून घेणारे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा चित्रपटाला मिळतो. वरुण आणि क्रिती जेव्हा थिएटरच्या टेरेसवर नाचू लागले तेव्हा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. एक प्रकारे तो चर्चेचा विषय बनला आणि निर्मात्यांना हेच हवे होते.
View this post on Instagram
चित्रपटांच्या प्रमोशनच्या पद्धती आता हळूहळू लोकांनाही समजू लागल्या आहेत. जेव्हा एखादी गोष्ट विनाकारण केली जाते तेव्हा ही गोष्ट त्यांनाही खटकते. जेव्हा क्रिती आणि वरुणचा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा सर्वजण म्हणत होते की हे लोक चित्रपटासाठी काहीही करू शकतात. काही जण म्हणतात, ‘तुम्ही हे सर्व का करत आहात?’.