हॉटेलपर्यंत पाठलाग केला, मानेवर हात ठेवून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला… कोरियन तरुणीने सांगितली संपूर्ण घटना

WhatsApp Group

मुंबईत कोरियन युट्यूबरच्या विनयभंगप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईतील रस्त्यांवर लाइव्ह व्हिडिओ बनवणाऱ्या कोरियन महिलेशी दोन मुलांनी गैरवर्तन केले. आता त्या महिलेने आपल्यासोबत नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती दिली आहे. मोबीन चांद मोहम्मद शेख (19) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (20) अशी आरोपींची नावे आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलिसांनी आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तरुणांना अटक केली.

एका इंग्रजी टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना पीडितेने सांगितले की, ‘त्यांनी हॉटेलपर्यंत माझा पाठलाग केला आणि त्यांनी माझा मोबाईल नंबर मागितला तेव्हा मी त्यांना खोटा नंबर दिला जेणेकरून मी पळून जाऊ शकेन. आरोपी तरुणाने प्रथम आय लव्ह यू म्हणत माझं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर आरोपी माझ्याकडे आला आणि त्यातील एकाने माझा हात धरला. त्याने मला लिफ्ट देण्याची त्यांनी विनंती केली. मी नकार दिल्याने आरोपीने माझ्या गळ्यावर हात ठेवून गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. मला धक्काच बसला. प्रकरण वाढू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने माझे मनगट पकडले आणि मला त्याच्या बाईककडे घेऊन जाऊ लागला. सुदैवाने, माझे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहत असलेला एक स्थानिक व्यक्ती तिथे आला आणि त्याने मला मदत केली आणि मला वाचवले असं महिलेने सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बुधवारी मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणाने युट्युबरचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या संदर्भात पोलिसांकडे कोणतीही तक्रार आली नसून, त्यांनी स्वत: या घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याचे सांगितले. व्हिडीओ शेअर करणार्‍या एका ट्विटर अकाऊंटने दावा केला आहे की, पीडित महिला, दक्षिण कोरियाची नागरिक असून, रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा उपनगरातील खार भागात ‘लाइव्हस्ट्रीमिंग’ करत होती. युवक महिलेच्या अगदी जवळ आला आणि महिलेला त्रास देऊ लागला.  महिलेचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा