मुंबईत कोरियन महिलेचा रस्त्यावर ‘विनयभंग’, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

मुंबईतील खार परिसरात काही तरुणांनी एका कोरीयन महिलेचा लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने या घटनेची माहिती ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. पोलिसांनी या संदर्भात त्यांच्याकडे कोणतीही तक्रार आली नसून, त्यांनी स्वत: या घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याचे सांगितले आहे.

आदित्य नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये YouTube च्या लाइव्ह स्ट्रीम सुरू असताना एका पुरुषाने महिलेचा हात पकडून कसा छळ केला हे दिसत आहे. युजरने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “@MumbaiPolice कोरियातील एका स्ट्रीमरला काल रात्री खारमध्ये या मुलांनी 1000 हून अधिक लोकांसमोर लाईव्ह स्ट्रीम करत असताना तिचा छळ केला. हे निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो तरुण महिलेच्या अगदी जवळ आला आणि तिने विरोध करूनही तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती महिला घटनास्थळावरून निघून जाऊ लागली.

या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही तक्रार मुंबई पोलिसांकडे आली नसून, पोलिसांनी स्वतःहून दखल घेत तपास सुरू केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी पीडितेकडून संपर्क तपशील मागवला आहे जेणेकरून या प्रकरणाचा तपास करता येईल. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, परंतु तपास सुरू झाला असून पोलीस महिलेचा छळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा