कोरियन गायिकाचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन; दारू पार्टी करत असताना अचानक पडून मृत्यू

WhatsApp Group

Korean Singer Park Bo Ram Passes Away: कोरियामधून एक वाईट बातमी येत आहे. प्रसिद्ध के-पॉप गायिका पार्क बो राम Park Bo Ram हिने वयाच्या 30 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गायिकेच्या मृत्यूची माहिती तिच्या एजन्सी XANADU एंटरटेनमेंटने दिली आहे. एजन्सीने एक निवेदन जारी केले की गायक पार्क बो राम हिचे 11 एप्रिल रोजी संध्याकाळी अचानक निधन झाले. ही बातमी कळताच संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by 박보람 (@ramramram2)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, के-पॉप गायिका पार्क बो राम यावर्षी तिच्या नवीन गाण्यांच्या रिलीजवर काम करत होती. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2010 मध्ये ती ‘सुपर स्टार के 2’ या गायन स्पर्धेचा भागही होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by 박보람 (@ramramram2)