कोकणातून धक्कादायक बातमी; स्वप्नात दिसला मृतदेह, तरुणाने गाठलं पोलीस ठाणे; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

WhatsApp Group

Konkan News खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खेडच्या भोस्ते घाटात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, मात्र हा प्रकार इथेच थांबत नाही.

एका माणसाने हाच मृतदेह स्वप्नात दिसल्याचा दावा केला होता आणि पोलिसांनी खरोखर घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर अगदी तसाच मृतदेह सापडला आहे. ‘रात्री पडलेल्या स्वप्नाचा’ उल्लेख चक्क पोलिसांच्या एफआयआरमधे केला होता.

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत राहणाऱ्या एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी स्वप्नात एक मृतदेह दिसला. त्याने याबाबत पोलिसांनी दिली. सुरूवातीला पोलिसांनी विश्वास ठेवला नाही, शेवटी योगेशच्या आग्रहामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे ठरवले.

डोंगरावर एक प्रेत आहे. तो माझ्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय की मला मदत करा. असं या तरुणाने सांगितलं होतं.

भोस्ते घाटातील एका झाडाजवळ पोलिसांना वास येत होता. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता मृतदेह आधळून आला. फादींला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. तिथून पुढे काही अंतरावर एक कवटी देखील सापडली.

घटना बऱ्याच महिन्यांपूर्वीची घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निर्जन परिसर असल्याने तिथे कोणी पोहोचू शकले नाही आणि मृतदेह कुजला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाची सध्या कोकणात सर्वत्र चर्चा सुरू आहे.