केकेआरने बंगळुरूचा पराभव करत विराटसेनेला दाखवला बाहेरचा रस्ता!

WhatsApp Group

शारजा – आयपीएल 2021 च्या एलिमेनेटर सामन्यात सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गडी राखून पराभवर केला. या विजयासह कोलकाता संघाने क्वालिफायर 2 गाठले आहे. तर विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. कोलाकाता संघ क्वालिफायर 2 मध्ये पंतच्या दिल्लीशी भिडणार आहे. या दोन्ही संघातील विजेत्या संघाला आयपीएलच्या फायनलचं तिकीट भेटेल.

क्वालिफायर 2 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खराब फलंदाजीमुळे बंगळुरूचा संघ 20 षटकांत 7 विकेट गमावत फक्त 138 धावा करू शकाला. बंगळुरूच्या संघाकडून कर्णधार विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक 39 धावा केल्या. तर केकेआरसाठी सुनील नारायणने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, लोकी फर्ग्युसनने 2 विकेट मिळवल्या.

पराभवाने संपला विराट कोहलीचा आयपीएलमधील कर्णधारपदाचा प्रवास

बंगळुरूचा संघ त्यांच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात होता. तर, कोलकात्याने 2012 आणि 2014 पूर्वी दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी विराटने आरसीबीचे कर्णधार पद सोडणार अशी घोषणा केली होती. एलिमिनेटर मध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. यासह कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलमधील कर्णधारपदाचा प्रवासही पराभवाने संपला आहे. विराटने 2013 पासून आजवर बंगळुरू संघासाठी 140 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात RCB ने 2016 च्या आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात मजल मारली होती.

IPL 2021 फायनलचं तिकिटं कोणाला मिळणार

क्वालिफायर 1 सामन्यात चेन्नईने दिल्लीला पराभूत करत यापूर्वीच आपलं फायनलचे तिकिटं पक्के केले आहे. आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली आणि कोलकाता आमने-सामने येणार असून यातील विजयी संघ IPL 2021 च्या विजेतेपदासाठी चेन्नईशी दोन हात करणार आहे. क्वालिफायर 2 सामना 13 ऑक्टोबरला तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळता जाणार आहे.