DC Vs KKR: आयपीएलच्या इतिहासातील तगडा विजय, कोलकाताने 106 धावांनी सामना जिंकला
IPL 2024 DC vs KKR: आयपीएल 2024 मधील 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. कोलकाताने हा सामना 106 धावांनी जिंकला. केकेआरचा या मोसमातील हा सलग तिसरा विजय आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 7 गडी गमावून 272 धावा केल्या. 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 17.2 षटकांत सर्वबाद 166 धावांवर आटोपला.
दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजी करताना कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान पंतने 4 चौकार आणि 5 शानदार षटकार मारले. पंतशिवाय स्टब्सने 54 धावांची शानदार खेळी केली. स्टब्सने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.
Three is not a crowd when it comes to back-to-back wins 😍 pic.twitter.com/uMq8gSVQoQ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2024
वरुण चक्रवर्ती आणि वैभव यांची शानदार गोलंदाजी
कोलकाता नाईट रायडर्सकडून या सामन्यात वरुण चक्रवर्ती आणि वैभवने अप्रतिम गोलंदाजी केली. वरुणने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. तर वैभवने 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्कने 2 आणि नरेन-रसेलने 1-1 विकेट घेतली.
कोलकाताच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. कोलकाताचा कडून सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी शानदार खेळी खेळली. आंद्रे रसेलने 41, रिंकू सिंगने 8 चेंडूत 26 धावा केल्या.
The doom of wickets in the 1️⃣3️⃣th over!
– courtesy VC 🤝 Tiger 🤝 Pandeyji pic.twitter.com/t83rDY4kCr
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2024
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २७२ धावा केल्या होत्या. केकेआरकडून फलंदाजी करताना सुनील नरेनने 85 धावांची तुफानी खेळी केली. नरेनने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकार मारले. याशिवाय आंद्रे रसेलने 41 धावांची तर रिंकू सिंगने 26 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजी करताना एनरिकने 3 तर इशांत शर्माने 2 बळी घेतले. याशिवाय खलील अहमदने एक विकेट घेतली.
सुनील नरेनची झंझावाती खेळी
कोलकातासाठी सलामीवीर सुनील नरेनने तूफान फलंदाजी केली. सुनील नरेनने केवळ 39 चेंडूत 85 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान नरेनने 7 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. सुनीलने अवघ्या 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, नरीनचे आयपीएलचे पहिले शतक हुकले.
Halfway through the innings and there’s no halt to Narine’s batting fireworks 💥
Young Angkrish Raghuvanshi has also moved to 33* off 16
Who’s breaking this partnership for #DC?
Follow the Match ▶️ https://t.co/SUY68b95dG#TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/pG5nn2E4eK
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
पदार्पणाच्याच सामन्यात आंगकृष्ण रघुवंशीने अर्धशतक झळकावले
कोलकातासाठी या सामन्यात आंगकृष्ण रघुवंशीला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचे दोन्ही हातांनी अंग्कृष्ट रघुवंशी यांनी सोने केले. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात, अंगक्रिशने संघासाठी शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात रघुवंशीने अवघ्या 27 चेंडूत 54 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले.