CSK vs KKR: कोलकाताने चेन्नईवर 6 विकेट्सने केली मात, नितीश-रिंकूची शानदार कामगिरी

0
WhatsApp Group

कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 18.3 षटकांतच लक्ष्य गाठले. कोलकाताकडून रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी चमकदार कामगिरी केली. रिंकूने 54 धावांची खेळी खेळली. तर नितीश राणाने नाबाद 57 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने ३ बळी घेतले.