Kolhapur: कुस्तीचा सराव करताना कोल्हापुरच्या पैलवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

WhatsApp Group

कोल्हापुरातून Kolhapur धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे या 23 वर्षाच्या पैलवानाचा रात्री मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मारुती सुरवसे असं त्या पैलवानाचं नाव आहे आहे. मारुतीचं मुळं गाव पंढरपूर जिल्ह्यात आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच शोककला पसरली आहे.

मारुती हा गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत असे. नेहमीप्रमाणे रात्री तालमीत कुस्तीचा सराव करू अंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मारुतीचा मृत्यू झाला.

मारुतीचे वडील वाखरी येथे शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवले होते. मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात सुद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा