
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद रत्नागिरी, पुणे, या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. (heavy rain fall) हवामान खात्याच्या माहितीनुसार गोवा, कर्नाटकमार्गे वारे वाहत असल्यामुळे कोल्हापूर सांगली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान काल (दि.19) संध्याकाळपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.
दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त कोल्हापूर शहरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले होते. शाहू मिल येथे 20 ते 22 मे 2022 दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी माहिती दिली.
दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पूर्वेकडील काही भागात मान्सूनची वाटचाल सुरू आहे आहे.
राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.