‘जे वर्तमानपत्र मी लहानपणापासून वाचत आलो, त्यांनीही फेक न्यूज…’ फेक न्यूजवर कोहलीची संतप्त प्रतिक्रिया

0
WhatsApp Group

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या आशिया चषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असून तो अनेकदा त्याच्या वर्कआउटचे व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांसाठी शेअर करत असतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त विराट कोहलीने लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर 15 ऑगस्टच्या संध्याकाळी त्याने फेक न्यूजवर एक स्टोरी शेअर केली. कोहलीने एका मोठ्या मीडिया संस्थेने शेयर केलेल्या फेक न्यूजवर आपला राग काढला.

खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप
विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने एका मोठ्या मीडिया संस्थेवर फेक न्यूज प्रकाशित केल्याचा आरोप केला आहे. विराट कोहलीने बातमीच्या छायाचित्रासोबत लिहिलं.. ‘जे वर्तमानपत्र मी लहानपणापासून वाचत आलो, त्यांनीही फेक न्यूज छापायला सुरुवात केली आहे.

या बातमीने विराट कोहली संतापला
कोहली आणि अनुष्का अलिबागच्या फार्महाऊसवर क्रिकेट खेळपट्टी बनवण्याच्या तयारीत असल्याची बातमी विराट कोहलीबाबत या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. या वृत्तावर कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. खरंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका दिवसानंतर अलिबागमध्ये स्पॉट झाले होते, त्यानंतर अनेक प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या.