
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावर जितका लोकप्रिय आहे तितकाच तो त्याच्या चाहत्यांमध्येही आहे. इंस्टाग्रामवर त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय आहे. Hopper HQ ने 2023 ची इंस्टाग्राम रिच लिस्ट जारी केली आहे. यानुसार विराट एका इंस्टाग्राम पोस्टसाठी (Virat Kohli Instagram Post Charge) $1,384,000 (सुमारे 11.45 कोटी रुपये) कमावले आहेत.
या यादीत स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (Ronaldo Instagram Per Post Charge) वर आहे. त्याच्यापाठोपाठ दिग्गज लिओनेल मेस्सीचा क्रमांक लागतो. रोनाल्डोबद्दल बोलायचे तर त्याने एका पोस्टमधून US $ 3.23 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 26.75 कोटी रुपये कमावले आहेत. तर मेस्सीने एका पोस्टसाठी USD 2.56 दशलक्ष म्हणजेच 21.49 कोटी रुपये कमावले आहेत.
View this post on Instagram
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली इंस्टाग्रामवरील पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा भारतीयच नाही तर आशियाई देखील आहे. जागतिक स्तरावर टॉप 20 यादीत स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव भारतीय आहे. सध्या इंस्टाग्रामवर त्याचे 256 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
या यादीत भारतीयांमध्ये बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास 29 व्या स्थानावर आहे. रिपोर्टनुसार, तिने एका इंस्टाग्राम पोस्टवरून US$ 532,000 (रु. 4.40 कोटी) कमावले आहेत.