Virat Kohli New Look: T20 विश्वचषकापूर्वी कोहलीने बदलली हेअरस्टाईल, विराटचा नवा लूक पाहिला का?

WhatsApp Group

Virat Kohli New Look: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घकाळ खराब फॉर्मशी झुंजत होता, परंतु आशिया कप 2022 मध्ये या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या स्पर्धेतील 5 सामन्यात त्याने 276 धावा केल्या. आता विराट कोहलीची नजर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 कडे आहे, पण याच दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराची नवीन हेअरस्टाईल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचा नवा हेअर लूक सोशल मीडियावर व्हायरल 

विशेष म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया 3 टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट कोहलीने हेअर लूक केसांचा लूक बदलला आहे. शनिवारी हेअरस्टायलिस्ट रशीद सलमानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो विराट कोहलीसोबत दिसत आहे. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “किंग कोहलीचा नवा लुक”. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Salmani (@rashidtheartist)

2022च्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबत मालिका खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत खेळवला जाईल. तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. त्याचवेळी, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील शेवटचा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.