Asia Cup 2023 चे वेळापत्रक, सामन्याची वेळ, ठिकाण, सर्वकाही येथे जाणून घ्या

WhatsApp Group

आशिया कप 2023 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळचे संघ आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषक 2023 चे वेळापत्रक, सामन्याची वेळ, ठिकाण आणि सर्वकाही जाणून घ्या.

आशिया चषक 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. भारतीय संघ श्रीलंकेत आपले सामने खेळणार आहे. याशिवाय उपांत्य आणि अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे.

आशिया चषक 2023 भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळला जाईल. या स्पर्धेचे सामने मुलतान, लाहोर, कॅंडी आणि कोलंबो या शहरांमध्ये खेळवले जातील.

आशिया कप 2023 एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. म्हणजेच दोन्ही संघ 50-50 षटके खेळतील. गेल्या वेळी टी-20 वर्ल्ड कपमुळे आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता.

आशिया कप 2023 भारतीय चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवर आशिया कप 2023 सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. क्रिकेट चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर एशिया कपचे सामने पाहता येणार आहेत.