IPL 2023 आयपीएलचा मिनी लिलाव, कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग 2023 पूर्वी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात एकूण 405 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. 991 खेळाडूंच्या सुरुवातीच्या यादीतून 10 संघांनी एकूण 369 खेळाडूंची निवड केली. नंतर संघांच्या आदेशानुसार 36 अतिरिक्त खेळाडू जोडण्यात आले आहेत.  हा मिनी लिलाव एकूण 87 स्लॉटसाठी असेल, त्यापैकी 30 परदेशी खेळाडूंसाठी ठेवण्यात आले आहेत. या यादीत 19 विदेशी खेळाडू आहेत ज्यांची सर्वात जास्त मूळ किंमत 2 कोटी आहे. लिलावाच्या यादीत 11 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 1.5 कोटी आहे. मनीष पांडे आणि मयंक अग्रवाल हे दोन भारतीय खेळाडू 20 क्रिकेटपटूंच्या यादीत आहेत ज्यांची मूळ किंमत एक कोटी आहे.

IPL 2023 लिलाव कधी, कुठे होणार?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव गुरुवार, 23 डिसेंबर रोजी कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित केला जाईल.

IPL 2023 लिलाव कधी सुरू होईल?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव दुपारी 2.30 वाजेपासून टीव्हीवर पाहता येईल.

कोणते टीव्ही चॅनेल आयपीएल 2023 लिलाव प्रसारित करतील?
आयपीएल 2023 साठी मिनी लिलावाचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमावर पाहता येईल.

चाहते IPL 2023 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पाहू शकतात?
Jio ग्राहक IPL 2023 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर मोफत पाहू शकतात.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा