विराटच्या जागी रोहित नव्हे ‘हा’ असेल भारताचा नवा कर्णधार!

WhatsApp Group

नवी दिल्ली – टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या संघाने आतापर्यंतचे खेळले गेलेले दोन्ही सामने गमावले आहेत. तर खेळाडूंनीही आपल्याला थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकानंतर लगेचच होणाऱ्या या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाची कमान सांभाळू शकतो, अशी बातमी समोर येत आहे.

भारताच्या कर्णधारपदासाठी राहुल पहिली पसंती असल्याचे बोर्डाच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले. सूत्राने सांगितले की, वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. आणि केएल राहुल हा या संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

चांगली गोष्ट म्हणजे या मालिकेसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, आम्ही चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देऊ पण पूर्ण क्षमतेने नाही. स्थानिक प्रशासनाशी बोलून त्यानुसार आराखडा तयार केला जाईल.

टी-20 मालिकेत वरिष्ठांना विश्रांती देण्याबाबत बोलताना जसप्रीत बुमराहने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 17, 19 आणि 21 नोव्हेंबरला टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. तर 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.